Advertisements

Prem प्रेम

Advertisements

प्रेम

लेखिका – तबस्सुम काशिद


तो सतत छळत असतो मला बोलत असतो

रागवत असतो टोमणे मारत असतो त्याचे बिनबुडाचे आरोप तो माझ्यावर फेकत असतो

मी हट्टी आहे भांडखोर आहे मीच भांडते वाद उकरून काढते हे देखील तो म्हणत असतो.

स्वतःच्या नामुष्कीचा राग तो माझ्यावर फुकटच चिडून व्यक्त करत असतो 

तसा तो फार शहाणा आहे कोणाची गरज नसते त्याला पण मग एक वेळ येते

अशी ही जेंव्हा त्याला माझी खरीच गरज लागते जेंव्हा तो खूप उदास होतो.

  जगाच्या चक्रात पिसला जातो दुनियदारीत हारतो तेंव्हा मात्र माझे हात असे घट्ट पकडतो

जसे एखादे निष्पाप बालक गर्दीत हरवू नये म्हणून आपल्या आईचे बोट घट्ट पकडून ठेवतो.

भरलेल्या डोळ्यांनी तो माझ्याशी मग किती तरी ऐकलेल्या न ऐकलेल्या गोष्टी शेअर करतो

तो कुठे कमी पडला त्याने काय काय केले सगळं सगळं सांगत राहतो

सर्वांविषयीच्या त्याच्या तक्रारी सांगत राहतो

मग हे सांगतानाही शेवटी तो माझ्यावर घसरतो त्याचे मग ते बोट माझ्याकडे वळते आणि 

तो माझ्यावर खोटे नाटे आरोप करतच राहतो  उसकी वे  शिकायते वो गिले शिकवे मैं चुपचाप सूनती रहती

  मिट्टीकी बुत बन कर ..तो बोलतच राहतो  तरीही मी काहीच बोलत नाही.

खरेतर खुप वाटते की ओरडून सांगावे त्याला कि हे सर्व खोटे आहे

अन तुला ही माहितीये हे सर्व खरे नाही ते तरी तू मला जवाबदार ठरवतोस 

यावेळी नाही ऐकून  घ्यायचे चांगलेच उत्तर देईन

त्याला आरसा दाखवून विचारिन खडसावून त्याच्या प्रत्येक बिनबुडाच्या आरोपाचे उत्तर घेईन

त्याच्याकडून कबूल करायला लावेन त्याला की तो माझ्यावर नेहमी चुकीचे लेबल लावून मोकळा होतो

त्याचा त्रास होतो मला   पण…मगमी मौन धरते

कारण माझी चुप्पी तर त्याची खरी ताकद आहे भ्रम आहे त्याचा  आणि

तो तसाच रहावा म्हणून मी त्याचे सर्व वाङगबाण  सहन करत राहते 

घुमी होऊन त्याचवेळी मनात मात्र द्वंद्व चालू राहते पण मग माझे त्याच्यावरील प्रेम जिंकते म्हणते

त्याच्यासाठी फक्त त्याच्यासाठी मी होईन अपराधीन आयुष्यभर राहू दे

असाच भ्रम  विलसू दे हासू त्याच्या मुखावर सदैव त्याच्या हास्यसाठी मी शतदा मरेल 

कारण मी खरोखर प्रेम करते त्याच्या वर मी खरोखर प्रेम करते त्याच्या वर

-तबस्सुम काशिद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *