Advertisements

प्रीत तुझी माझी

Advertisements

प्रीत तुझी माझी

मनसोक्त बरसतात
रिमझिम पाऊसधारा
चिंबचिंब भिजली
नटखट वसुंधरा…

पारिजातकाचा मस्त
सुगंध दरवळला
वसुंधरावर फुलांचा
सडा छान शिंपडला...

अवखळ अल्लड वारा
बोलतोय मस्त कानात
मातीचा धूंद सुगंध
पसरला दाही दिशात,..

हरीत शालूचे लेणं
सारी  सृष्टी ल्याली
दवबिंदूंच्या थेंबाने
अंग अंग मोहरली...

प्रीत तुझी माझी
पावसा मस्तच जमली
येतो बरसतो मनसोक्त
वसुधाही छान सजली…..

  वसुधा नाईक, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *