Advertisements
Advertisements

चांदण्याची ओंजळ

सजना तुझी एकांतात आठवण म्हणजे
मऊ मोर पिसाचा हळुवार स्पर्श
तुझ्या मिठीत नित्य सामावण्याचा
मनातून होणारा असीम हर्ष…..

तुझ्यायेण्याने,जाण्याने,बोलल्याने
तुझ्याच स्वप्नाने सजते माझे गाव
तुझ्या मिलनाची ओढ खूप आहे
कामसाधानेच्या सागरात डोलतेय रे नाव..

तुझ्या नावाचं कुंकू माझ्या कपाळा
तुझ्याच नावाचा मंगळसूत्र घातले गळा
बाजूबंद घातले दंडी,नथनी नाकी
सजला साज शृंगाराने हा देह मळा….

जीवनात आलास सोबती होऊनी
श्वास तुच माझा, आहेस या जीवनी
नवरा माझा नवसाचाच जणूकाही
उदंड आयुष्य मिळो रे त्याला प्रार्थना मनी…

तुझ्यासोबत जोडली अगणित नाती
चंद्र,सूर्य,तारे यांच्या समवेत नभांगणात
चांदण्यांची ओंजळ स्वप्नवत माझी
रिती करते तुझ्या फुल- झाडांच्या अंगणात…

वसुधा नाईक,पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चांदण्याची ओंजळ