Advertisements

Mitra Friend

Advertisements

मित्र

आयुष्यात एक तरी मित्र असावा
सुखाला दुःखाला साथ देणारा
दुःखाच्या वेलीला सुखांची झाड लावणारा…

आयुष्यात एक तरी मित्र असावा
आपल्याला समजून उमजून घेणारा
आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा…..

आयुष्यात एक तरी मित्र असावा
मनापासून आपल्यावर प्रेम करणारा
मनापासून दाद देणारा…..

आयुष्यात एक तरी मित्र असावा
दुःखात आपले अश्रू पुसणारा
मनातले सारे शेअर करणारा….

वसुधा नाईक, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *